May 19, 2026


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील इयत्ता ५ वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PUP) तसेच इयत्ता ८ वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSS) मध्ये गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

इयत्ता पाचवीमधील एकूण ४३ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी ९ विद्यार्थी पात्र झाले तर इयत्ता आठवीमधील एकूण १७ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी १ विद्यार्थी पात्र झाला. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे उल्लेखनीय यश शक्य झाले आहे.

कठोर परिश्रम आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातून मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करून कौतुक करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री. दिपक बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.गोरख मालुंजकर, मार्गदर्शक शिक्षक श्री.धनंजय लहामगे, श्री.संजय देशमुख व त्याचबरोबर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. या वेळी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



GO TO HOME PAGE