March 20, 2026
जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST) ही ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा दरवर्षी आयोजित केली जाते. यामध्ये मानसिक क्षमता, अंकगणित आणि भाषा या विषयांवर १०० गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत निवास आणि शिक्षणाची सुविधा मिळते.
गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ५ वी मधील विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाचा गौरव वाढवला आहे. सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या नवोदय परीक्षेत २० पैकी तब्बल ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षेत विद्यालयाचा निकाल ५५.०० % इतका लागला आहे.
उत्तीर्ण विद्यार्थी-
1. साबळे ओम राजेविनोद- 83.75
2. शौर्य विजय वालतुले- 73.75
3. निहाल जगन्नाथ कचरे- 73.75
4. मयुरी भगवंता चौधरी- 70.00
5. प्रीतम काळू भांगरे- 67.50
6. काव्या निलेश मुतडक- 67.50
7. आर्या जयराम धादवड- 66.25
8. स्वराली विनोद काठे- 63.75
9. प्राप्ती नवनाथ भांगरे- 60.00
10. रुद्र अमित बांबेरे- 58.75
11. श्रीधर बिपिन धुमाळ- 51.75
श्रीमती कोल्हाळ मॅडम
कठोर परिश्रम आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातून मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करून कौतुक करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री. दिपक बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.गोरख मालुंजकर, मार्गदर्शक शिक्षक व त्याचबरोबर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. या वेळी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.














