jalindar hile-hsc first in taluka in commerce-image

May 10, 2026


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या HSC बोर्ड परीक्षा २०२६ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. अकोले तालुक्यातील आदिवासी विभागातील राजूरमधील मुख्य शैक्षणिक केंद्र असलेल्या सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील वाणिज्य शाखेमध्ये शिकणारा विद्यार्थी जालिंदर भगवंता हिले हा ८८.१७ % गुण मिळवून वाणिज्य शाखेमध्ये अकोले तालुक्यामध्ये पहिला आला.

गरीब व आदिवासी कुटुंबातील या विद्यार्थ्याने केलेल्या कामगिरीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज १० मे रोजी जालिंदरचा त्याचे मूळगाव असलेल्या गोंदोशी येथे ग्रामस्थांनी भव्य मिरवणुक काढून व सत्कार करून आनंदोत्सव साजरा केला.

याप्रसंगी आयोजित सत्कार समारंभासाठी अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरणजी लहामटे उपस्थित होते. राजर्षी शाहू महाराज विद्यालय साकीरवाडीचे मुख्याध्यापक श्री.बाळू भाऊ घिगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गोंदोशी गावच्या सरपंच श्रीमती रत्नाताई हिले, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री.अंकुश भांगरे, कॉ.नामदेवराव भांगरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.नवले गुरुजी व श्री.चिंधू भांगरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.भीमराव भांगरे, सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे, शिक्षक श्री.विकास जोरवर व श्री.बाळासाहेब घिगे, साकीरवाडी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.शशिकांत नागरे, श्री.जगन्नाथ मुतडक व श्री.नंदवानी, श्री.धनंजय मोहंडुळे आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. गोंदोशी व परिसरातील गावांमधील नागरिक देखील या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्याक्रमाआगोदर वाणिज्य शाखेत तालुक्यात पहिला आलेला जालिंदर भगवंता हिले व विद्यालयात वाणिज्य शाखेत दुसरा आलेला अरुण रामदास लेंडे या दोघांची डीजेच्या तालावर गावातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार डॉ. किरणजी लहामटे यांनी जालिंदरने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. गोंदोशी सारख्या आदिवासी व दुर्गम भागातील या विद्यार्थ्यांने मिळविलेले यश हे सर्वांसाठी प्रेराणादाई असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. जालिंदर व अरुण या दोघांनाही आमदार साहेबांनी भावी वाटचालीस शुभेछा दिल्या. यावेळी उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे व शिक्षक श्री.विकास जोरवर यांनीही मनोगते व्यक्त करून या दोन्ही विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेछा दिल्या. साकीरवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.बाळू भाऊ घिगे यांनी जालिंदरच्या साकीरवाडी विद्यालयातील १० वी पर्यंतच्या त्याच्या शैक्षणिक प्रवासातील आठवणी सांगितल्या.

सत्काराला उत्तर देताना जालिंदरने सर्वांप्रती ऋण व्यक्त करत आपल्या शैक्षणिक प्रवासातील अनेक आठवणी सांगून उपस्थितांची मने जिंकली. आई-वडिलांचे संस्कार, थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद व शिक्षकांचे मार्गदर्शन या बळावर मी आतापर्यंतचा प्रवास यशस्वीरीत्या पार केला व भविष्यातही मी निश्चित यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचेल असा विश्वास जालिंदरने व्यक्त केला. आपल्या जडणघडणीमध्ये साकीरवाडी विद्यालय व सर्वोदय विद्यालय या दोन्ही शाळांचा खूप मोलाचा वाटा असल्याचे जालिंदरने सांगितले.

राजूरमधील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील वसतिगृहामध्ये राहून जालिंदरने सर्वोदयमध्ये इयत्ता ११ वी व १२ वी चे वाणिज्य शाखेमध्ये शिक्षण पूर्ण केले. जालिंदरने मिळविलेल्या या यशाबद्दल प्रकल्पाधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे, गृहपाल श्री.विनय जगताप, सत्यनिकेतन संस्थेचे सचिव श्री.एम.एल.मुठे व कोषाध्यक्ष श्री.विवेकजी मदन, गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर यांनीही जालिंदरने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.