March 31, 2026
मंथन परीक्षा (Manthan Exam) ही प्रामुख्याने इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाणारी एक राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा आहे. ‘मंथन वेलफेअर फाउंडेशन’ किंवा तत्सम संस्थांद्वारे विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमता आणि सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. मराठी, इंग्रजी आणि सेमी-इंग्रजी अशा तिन्ही माध्यमांतील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. यामध्ये प्रामुख्याने भाषा (मराठी/इंग्रजी), गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित प्रश्न असतात. परीक्षेत उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीनुसार (Merit List) ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख रकमेची बक्षिसे दिली जातात.
सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय मंथन परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाचा गौरव वाढवला आहे. सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षात इयत्ता ६ वी व ७ वी च्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या मंथन परीक्षेत २० पैकी तब्बल ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उत्तीर्ण विद्यार्थी-
कठोर परिश्रम आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातून मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करून कौतुक करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री. दिपक बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.गोरख मालुंजकर, मार्गदर्शक शिक्षक व त्याचबरोबर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. या वेळी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.












