September 19, 2026


क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व तालुका क्रीडा समिती, अकोले यांचे संयुक्त विद्यमाने अकोले महाविद्यालयात नुकतीच भव्य तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेमध्ये सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत विद्यालयाचा लौकिक वाढविला. अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली-

१. गांगड मंगेश प्रकाश- इ. ११ वी विज्ञान 
२. कुंदे चेतन खंडू- इ. १२ वी विज्ञान 
३. बारवकर सुदेष्णा संतराम- इ. ८ वी 

या सर्व स्पर्धकांनी तालुकास्तरावर विजेतेपद मिळवून त्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. राजूरसारख्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी बुद्धीबळासारख्या खेळामध्ये अप्रतिम कामगिरी केल्याबद्दल या तिघांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री.तारू व्ही.टी. श्री.आरोटे जे.आर. या दोघांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा व तालुक्यातील उपस्थित विविध मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली.

सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड.एम.एन.देशमुख, सचिव श्री.एम.एल.मुठे व कोषाध्यक्ष श्री.विवेकजी मदन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बनकर बी.के., उपप्राचार्य श्री.बु-हाडे डी.जी., पर्यवेक्षक श्री.व्यवहारे  एस.पी. तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील कामगीरीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

GO TO HOMEPAGE