September 16, 2026
अहिल्यानगर क्रीडा कार्यालय, अकोले तालुका क्रीडा समिती व गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयाच्या सुसज्ज अशा इनडोअर स्टेडीअममध्ये आज १६/०९/२०२६ रोजी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडल्या.
सत्यनिकेतन संस्थेचे संचालक श्री.विजय पवार यांचे शुभहस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.वाय.देशमुख, गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे व पर्यवेक्षक श्री.एस.पी.व्यवहारे, अकोले तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री.योगेश उगले, कुस्ती प्रशिक्षक श्री.तानाजी नरके, माजी प्राचार्य श्री.लहानू परबत व श्री.सदाशिव गिरी, श्री.किशोर देशमुख, क्रीडा शिक्षक प्रा.विकास नवले, श्री.राधाकिसन देशमुख तसेच तालुक्यातील अनेक क्रीडा शिक्षक, स्पर्धक विद्यार्थी व पालक याप्रसंगी उपस्थित होते.
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री.जालिंदर आरोटे व श्री.विनोद तारू यांनी या स्पर्धेचे उत्कृष्ठ नियोजन केले. श्री.संतराम बारवकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
सर्वोदयच्या विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी….
अतिशय प्रतिष्ठित अशा समजल्या जाणा-या या स्पर्धेमध्ये सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून तालुक्यामध्ये कुस्तीमधील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
14 वर्षे मुले
1. पाटील प्रणव प्रकाश- 35 Kg प्रथम
2. चौधरी जय जगदीश- 41 Kg प्रथम
3. लहामगे मयुरेश पंकज- 44 Kg प्रथम
4. चौधरी योगेश गजानन- 57 Kg प्रथम
5. देशमुख अनिकेत प्रकाश- 62 Kg प्रथम
6. साळुंके कारण प्रकाश- 44 Kg द्वितीय
17 वर्षे मुले
1. देठे सुयोग संदीप- 48 Kg प्रथम
2. चौधरी सार्थक बाळासाहेब- 51 Kg प्रथम
3. चौसदगीर सार्थक वाळू- 55 Kg प्रथम
4. येलमामे साईराज अशोक- 60 Kg प्रथम
17 वर्ष मुले (ग्रीको रोमन)
1. देशमुख करण रविंद्र- 45 Kg प्रथम
2. डोके कृष्णा लक्ष्मण- 48 Kg प्रथम
3. धनगर धनराज हरी- 55 Kg प्रथम
19 वर्षे मुले
1. बोऱ्हाडे जयेश गणेश- 57 Kg प्रथम
2. मुर्तडक सुरज संजय- 61 Kg प्रथम
3. देशमुख अधिराज राधाकिसन- 65 Kg प्रथम
4. भोईर ऋतिक मानकू- 70 Kg प्रथम
5. येलमामे युवराज जालिंदर- 74 Kg प्रथम
6. मेंगाळ मयूर खंडू- 79 Kg प्रथम
7. सोनुले राहुल दिगंबर- 86 Kg प्रथम
19 वर्ष मुले (ग्रीको रोमन)
1. साठे सुयोग प्रवीण- 55 Kg प्रथम
2. लोहरे निलेश गणपत- 60 Kg प्रथम
3. देशमुख कारण काळू- 63 Kg प्रथम
19 वर्ष मुली
1. जाधव ईश्वरी पोपट- 50 Kg प्रथम
सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड.एम.एन.देशमुख, सचिव श्री.एम.एल.मुठे, कोषाध्यक्ष श्री.विवेकजी मदन व प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.














