svm teachers day-image

September 05, 2026


गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज ५ सप्टेंबर २०२६ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून माध्यमिक व उच्च माध्यमिक दोन्ही विभागामध्ये स्वतंत्ररीत्या हा दिन साजरा करण्यात आला.

सकाळच्या सत्रात माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी तसेच दुपारच्या सत्रात उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक व परिचर या भूमिका योग्यरित्या पार पाडून शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन उत्तमरीत्या हाताळले.

याप्रसंगी शेवटी आयोजित कार्यक्रमांची रूपरेषा विद्यार्थ्यांनी आखली. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थी-शिक्षकांनी आपल्याला आलेले अनुभव व आपली मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंच्या प्रति आदर दाखवत त्यांचा सत्कार केला.

विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बु-हाडे, पर्यवेक्षक श्री.एस.पी.व्यवहारे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. माध्यमिक विभाग कार्यक्रम-प्रमुख श्री.एस.एच.हेकरे व सौ.आर.पी.सानप तसेच उच्च-माध्यमिक विभाग कार्यक्रम-प्रमुख श्री.एस.जे.शेटे व श्री.ए.डी.तळेकर यांनी या कार्यक्रमांचे उत्कृष्ठ नियोजन केले.

उच्च माध्यमिक विभागामध्ये जय आभाळे व काजल देशमुख या विद्यार्थ्यांनी प्राचार्य म्हणून तर ऋतुजा धादवड व मयूर खोकले या विद्यार्थ्यांनी उपप्राचार्य म्हणून अतिशय प्रभावीपणे कामकाज सांभाळले. माध्यमिक विभागाच्या २०० व उच्च माध्यमिक विभागाच्या ८० विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांची भूमिका पार पाडली.

श्री.किशोर देशमुख यांनी माध्यमिक विभागाच्या कार्यक्रमामध्ये, तर श्री.संतराम बारवकर यांनी उच्च माध्यमिक विभागाच्या कार्यक्रमामध्ये शिक्षक दिनाचे महत्व विषद केले. दिव्या वालझाडे, स्वरा अवसरकर, रोशनी घिगे व मुग्धा धांडे या विद्यार्थ्यांनी माध्यमिक विभागाच्या कार्यक्रमामध्ये आपली मनोगते व्यक्त केली. तसेच दिपाली मदगे, तेजल घिगे, ज्ञानेश्वरी भडांगे, समिक्षा सदगीर, दिव्या गोडे, विद्या बांगर, फसा घाणे व वैष्णवी हंगेकर या विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक  विभागाच्या कार्यक्रमामध्ये आपली मनोगते व्यक्त केली. मधुरा अवसरकर हिने अत्यंत प्रभावी असे सूत्रसंचलन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी-शिक्षकांना अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


माध्यमिक विभाग


उच्च-माध्यमिक विभाग

GO TO HOMEPAGE