October 03, 2026


सर्वोदयच्या विद्यार्थ्यांचा तालुक्यापाठोपाठ जिल्ह्यातही डंका….


क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर जिल्हा कुस्ती संघ व त्रिमूर्ती शैक्षणिक व क्रीडा संकुल, नेवासा फाटा यांचे संयुक्त विद्यमाने नेवासा येथे भव्य जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील चार कुस्ती मल्लांनी सुवर्णपदक पटकावले.

या सर्व विद्यार्थ्यांची ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सोलापूर विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

लहामगे मयुरेश पंकज (१४ वर्षे) ४४ किलो, सुवर्णपदक
साठे सुयोग प्रवीण (१९ वर्षे) ५५ किलो, सुवर्णपदक
बोऱ्हाडे जयेश गणेश (१९ वर्षे) ५७ किलो, सुवर्णपदक
मुर्तडक सुरज संजय (१९ वर्षे) ६१ किलो, सुवर्णपदक

सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड.एम.एन.देशमुख, सचिव श्री.एम.एल.मुठे, कोषाध्यक्ष श्री.विवेकजी मदन व प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. साई कुस्ती आखाड्याचे संचालक श्री. तान्हाजी नरके यांच्या अथक परिश्रमातून जिल्हापातळीवर विद्यालयाला हे यश प्राप्त झाले आहे. क्रीडा शिक्षक श्री.तारू व्ही.टी. व श्री.आरोटे जे.आर. यांचेही मोलाचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले.


GO TO HOMEPAGE