July 29, 2026
आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा (व्यासपौर्णिमा) साजरी केली जाते. आपल्या आध्यात्मिक व शैक्षणिक गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महर्षी वेद व्यास यांचा जन्मोत्सव सर्वत्र मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने साजरा केला जातो.
गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
महर्षी वेद व्यास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. याप्रसंगी उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे, ज्येष्ठ शिक्षक श्री.संतराम बारवकर, श्री.रविंद्र मढवई, श्री.सचिन लगड, श्री.रविंद्र तातळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागचा उद्देश विषद केला. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते ज्येष्ठ शिक्षक श्री.संतराम बारवकर यांनी अनेक पुराणातील काही कथा व प्रसंग सांगून गुरुपौर्णिमेचे महत्व सांगितले. गुरु म्हणजे आपल्याला जीवन मार्ग दाखवणारा दीपस्तंभ. आपण या दीपस्तंभाचा आधार घेऊन जीवन प्रकाश जीवनाचा मार्ग सुकर करावा असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
श्री.रविंद्र मढवई यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. श्री.सचिन लगड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.











