September 29, 2026


भारतीय क्रीडा प्राधिकरणाद्वारे (SAI- Sports Authority of India) मुंबईमध्ये दरवर्षी SAI Intra-Region: साई प्रादेशिक कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध संलग्न तालीम (आखाडे) आणि खेलो इंडिया केंद्रांमधील सुमारे १५० हून अधिक कुस्तीपटू सहभागी होतात. या प्रादेशिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे अव्वल कुस्तीपटू राष्ट्रीय स्तरावरील मुख्य ‘आंतर साई कुस्ती स्पर्धेसाठी’ (Inter-SAI Wrestling Tournament) पात्र ठरतात.

२९ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथे संपन्न झालेल्या इंटरसाई कुस्ती स्पर्धेमध्ये सत्यनिकेतन संस्थेच्या गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कुस्तीविरांनी अतिशय नेत्रदीपक कामगिरी केली आहे. या कुस्तीपटूंची राष्ट्रीय स्तरावरील मुख्य ‘आंतर-साई कुस्ती स्पर्धेसाठी’ (Inter-SAI Wrestling Tournament) निवड झाली आहे.

सर्वोदयचे यशस्वी कुस्तीपटू:

१. जयेश गणेश बोऱ्हाडे (इ. १२ वी वाणिज्य) – प्रथम
२. अधिराज राधाकिसन देशमुख (इ. १२ वी विज्ञान)- प्रथम
३. सूरज संजय मुतडक (इ. १२ वी वाणिज्य)- द्वितीय
४. मयूरेश पंकज लहामगे (इ. ९ वी)- तृतीय

जयेश बोऱ्हाडे
व
अधिराज देशमुख या दोघांची राष्ट्रीय आंतर-साई कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

कुस्ती प्रशिक्षक श्री.तानाजी नरके यांचे या सर्व यशस्वी कुस्तीपटूंना अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभले. सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड.एम.एन.देशमुख, सचिव श्री.एम.एल.मुठे, कोषाध्यक्ष श्री.विवेकजी मदन, विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के. बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी. बु-हाडे, पर्यवेक्षक श्री.एस.पी. व्यवहारे, क्रीडा शिक्षक श्री.जालिंदर आरोटे व श्री.विनोद तारू तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कामगीरीसाठी शुभेच्छा दिल्या.