October 25, 2026
सत्यनिकेतन संस्थेच्या संस्थापक कोषाध्यक्षा तथा थोर गांधीवादी कार्यकर्त्या स्व.सावित्रीबाई मदन यांना ३० व्या पुण्यतिथीनिमित्ताने आज दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सत्यनिकेतन संस्थेतील त्यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सत्यनिकेतन परिवारातील सर्व पदाधिकारी, संचालक, सभासद, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने सावित्रीबाई मदन वसतिगृहातील मुलींनी व उपस्थित सर्व शिक्षकांनी सर्वधर्मीय प्रार्थनांचे गायन केले.
सत्यनिकेतन संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.विजय पवार, श्री.विनय सावंत, प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख, प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर व श्रीमती रजनी टिभे यांनी याप्रसंगी आपली मनोगते व्यक्त केली. सत्यनिकेतन संस्थेच्या जडण-घडणीमध्ये सावित्रीबाईंनी केलेल्या त्यागाची आठवण या सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये करून दिली. सर्वांनी सावित्रीबाईंच्या पवित्र स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा इतिहास सांगितला. गुरुवर्य रा.वि. पाटणकर, बापूसाहेब शेंडे व सावित्रीबाई मदन या त्रिमुर्तींचा सत्यनिकेतन संस्थेच्या उभारणीमध्ये असलेल्या योगदानाचा देखील मान्यवरांनी उल्लेख केला.
मुख्याध्यापक श्री.गोरख मालुंजकर, उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे, उपमुख्याध्यापक श्री.संजय व्यवहारे, पर्यवेक्षक श्री.श्रीकांत घाणे, ज्येष्ठ शिक्षक श्री.किशोर देशमुख, वसतिगृह अधीक्षिका श्रीमती जोशी मॅडम व अधीक्षक श्री.ढगे सर यांच्यासह सत्यनिकेतन संस्थेच्या सर्व विभागांतील कर्मचारीवर्ग याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होता. ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती बीना सावंत यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून रूपरेषा विषद केली.














