September 21, 2026


क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व तालुका क्रीडा समिती, अकोले यांचे संयुक्त विद्यमाने अभिनव पब्लिक स्कूल, अकोले येथे तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

१९ वर्षे वायोगटातील मुलांनी अंतिम सामना जिंकून जिल्हा स्तरावर धडक मारली आहे. राजूरसारख्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी व्हॉलीबॉल खेळामध्ये तालुका स्तरावर अप्रतिम कामगिरी केल्याबद्दल सर्वांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री.तारू व्ही.टी.श्री.आरोटे जे.आर. या दोघांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा व तालुक्यातील उपस्थित विविध मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड.एम.एन.देशमुख, सचिव श्री.एम.एल.मुठे व कोषाध्यक्ष श्री.विवेकजी मदन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बनकर बी.के., उपप्राचार्य श्री.बु-हाडे डी.जी. व पर्यवेक्षक श्री.व्यवहारे  एस.पी. व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

  १९ वर्षे मुले प्रथम
  १७ वर्षे मुले द्वितीय
  १४ वर्षे मुले तृतीय
  १७ वर्षे मुली तृतीय
  १९ वर्षे मुली द्वितीय

GO TO HOMEPAGE