NMMS (National Means-cum-Merit Scholarship) ही केंद्र सरकारद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबवली जाणारी शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनेअंतर्गत इ. ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरमहा १,००० रुपये (वार्षिक १२,००० रुपये) शिष्यवृत्ती दिली जाते.

गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सन २०२५-२६ या वर्षामध्ये NMMS परीक्षेत घवघवीत यश मिळवत विद्यालयाचा लौकिक वाढविला. एकूण २९ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते त्यापैकी १३ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा शेकडा निकाल ४४.८२% इतका लागला आहे.

उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत-

1. वालझडे दिव्या सोमनाथ
2. पवार निवेदिता वैभव
3. माळी मंजिरी दिनकर
4. महाले तनुजा दिलीप
5. देशमुख करण भास्कर
6. पवार सार्थक संजय
7. भांगरे देवेंद्र मनोहर
8. देशमुख श्रीलेखा धर्मराज
9. धिंदळे श्रीराम काशिनाथ
10. घाणे विजय लक्ष्मण
11. नवाळी ओम अनिल
12. देशमुख अथर्व विठ्ठल
13. दिघे सुप्रिया मारुती

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.जी.बी. मालुंजकर, NMMS परीक्षा प्रमुख श्रीमती रोहिणी सानप व त्याचबरोबर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.