May 8, 2026
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या SSC बोर्ड परीक्षा २०२६ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. अकोले तालुक्यातील आदिवासी विभागातील राजूरमधील मुख्य शैक्षणिक केंद्र असलेल्या सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने याही वर्षी उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली.
कॉपीमुक्त व तणावमुक्त वातावरणात पार पडलेल्या या परीक्षेमध्ये सर्वोदयच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश खरोखरच कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. परीक्षेस बसलेल्या १८९ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विद्यालयाचा एकूण निकाल 96.29%
(189 पैकी 182 विद्यार्थी उत्तीर्ण)
| प्रथम पाच विद्यार्थी |
| प्रथम– कु. वाकचौरे आयुष्का योगेश- 95.20 % |
| द्वितीय– कु. शहा यशवी अनिकेत- 92.00 % |
| तृतीय– कु. दिघे आरती मारुती- 90.60 % |
| चतुर्थ- कु. गभाले जानवी गणपत– 89.60 % |
| पाचवा- माने साई दिपक– 88.00 % |




विशेष बाब…
नशिबाचा आणि अभ्यासाचा अजब समतोल साधणारा अवलिया, सुशांत रोंगटे….
गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर, राजूरच्या सुशांत मच्छिंद्र रोंगटे या विद्यार्थ्याने एक आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. सुशांतने SSC परीक्षेत सर्वच्या सर्व ६ विषयांत तंतोतंत ‘३५’ गुण मिळवून एक अनोखा ‘बॅलन्स’ साधला आहे. गणिताच्या भाषेत सांगायचे तर हा केवळ योगायोग नसून एक ‘परफेक्ट स्टॅटिस्टिकल वंडर’ आहे. या चकित करणाऱ्या निकालासाठी सुशांतचे मनापासून अभिनंदन!


सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड.एम.एन.देशमुख, सचिव श्री.एम.एल.मुठे, कोषाध्यक्ष श्री.विवेकजी मदन, प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.जी.बी. मालुंजकर यांच्यासह संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यालयाच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











