July 18, 2026


सामाजिक वनीकरण विभाग, अकोले व सर्वोदय Eco Club यांचे संयुक्त विद्यमाने गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये २१ मार्च २०२६ रोजी ‘जागतिक वन दिवस’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला होता. या दिनाचे औचित्य साधून ‘वनसंवर्धन’ या विषयावर आधारित विद्यालयामध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. राष्ट्रीय हरित सेना प्रमुख श्री.श्रीकांत घाणे यांनी इको-क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेचे उत्कृष्ठ नियोजन केले होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर व उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या स्पर्धा पार पडल्या होत्या.

आज १८ जुलै २०२६ रोजी या स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, पर्यवेक्षक श्री.संजय व्यवहारे, राष्ट्रीय हरित सेना प्रमुख श्री.श्रीकांत घाणे व सहकारी शिक्षक व शिक्षिका यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करून विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.


बक्षिसपात्र विद्यार्थी

चित्रकला स्पर्धा: छोटा गट
प्रथम: घिगे प्रज्ञा रवींद्र (इयत्ता ७ वी)
दितीय: हंगेकर ईश्वरी संजय (इयत्ता ७ वी)
तृतीय: लहामगे शिवतेज वाल्मिक (इयत्ता ७ वी)
उत्तेजनार्थ: पाटील हर्षित विवेक (इयत्ता ५ वी)
उत्तेजनार्थ: लहामगे आराध्या सुरज (इयत्ता ६ वी)
चित्रकला स्पर्धा: मोठा गट
प्रथम: पवार साई संतोष (इयत्ता ८ वी)
दितीय: मनियार अलिशा अश्पाक (इयत्ता ८ वी)
तृतीय: लहामगे आचल वाल्मिक (इयत्ता ८ वी)
उत्तेजनार्थ: माळी मंजिरी दिनकर (इयत्ता ८ वी)

निबंध स्पर्धा: छोटा गट

प्रथम: घिगे प्रज्ञा रवींद्र (इयत्ता ७ वी)
दितीय: बारवकर सुदेष्णा संतराम (इयत्ता ७ वी)
तृतीय: पिचड गौरी प्रदीप (इयत्ता ६ वी)
तृतीय: बांडे श्रुती शंकर (इयत्ता ७ वी)
निबंध स्पर्धा: मोठा गट
प्रथम: देशमुख श्रीलेखा धर्मराज (इयत्ता ९ वी)
दितीय: सावंत प्रतीक्षा नारायण (इयत्ता ९ वी)
तृतीय: अवसरकर स्वरा निवृत्ती (इयत्ता ९ वी)
तृतीय: महाले तनुजा दिलीप (इयत्ता ९ वी)


सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. या वेळी सर्वांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.