March 21, 2026


जागतिक वन दिवस (International Day of Forests) हा दरवर्षी २१ मार्च रोजी साजरा केला जातो. वनांचे महत्त्व आणि सर्व प्रकारच्या वृक्षांच्या संवर्धनाबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने २८ नोव्हेंबर २०१२ रोजी २१ मार्च हा दिवस ‘जागतिक वन दिन’ म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. पहिला ‘जागतिक वन दिन’ २१ मार्च २०१३ रोजी साजरा करण्यात आला.

गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ‘जागतिक वन दिवस’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग, अकोले यांच्या वतीने विद्यालयात व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. वनपाल श्री.कासार साहेब, वनरक्षक श्री.गंभीरे साहेब, श्रीमती सविता गोडे मॅडम तसेच वनरक्षक श्री.पाटील साहेब यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्व स्पष्ट करून सांगितले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, पर्यवेक्षक श्री.गोरख मालुंजकर, ज्येष्ठ शिक्षक श्री.संजय देशमुख यांनी मान्यवरांचा सत्कार केला. ज्येष्ठ शिक्षक श्री.श्रीकांत घाणे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

या दिनाचे औचित्य साधून ‘वनसंवर्धन’ या विषयावर आधारित विद्यालयामध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.


निकाल:
चित्रकला स्पर्धा: छोटा गट
प्रथम: घिगे प्रज्ञा रवींद्र (इयत्ता ७ वी)
दितीय: हंगेकर ईश्वरी संजय (इयत्ता ७ वी)
तृतीय: लहामगे शिवतेज वाल्मिक (इयत्ता ७ वी)
उत्तेजनार्थ: पाटील हर्षित विवेक (इयत्ता ५ वी)
उत्तेजनार्थ: लहामगे आराध्या सुरज (इयत्ता ६ वी)
चित्रकला स्पर्धा: मोठा गट
प्रथम: पवार साई संतोष (इयत्ता ८ वी)
दितीय: मनियार अलिशा अश्पाक (इयत्ता ८ वी)
तृतीय: लहामगे आचल वाल्मिक (इयत्ता ८ वी)
उत्तेजनार्थ: माळी मंजिरी दिनकर (इयत्ता ८ वी)

निबंध स्पर्धा: छोटा गट

प्रथम: घिगे प्रज्ञा रवींद्र (इयत्ता ७ वी)
दितीय: बारवकर सुदेष्णा संतराम (इयत्ता ७ वी)
तृतीय: पिचड गौरी प्रदीप (इयत्ता ६ वी)
तृतीय: बांडे श्रुती शंकर (इयत्ता ७ वी)
निबंध स्पर्धा: मोठा गट
प्रथम: देशमुख श्रीलेखा धर्मराज (इयत्ता ९ वी)
दितीय: सावंत प्रतीक्षा नारायण (इयत्ता ९ वी)
तृतीय: अवसरकर स्वरा निवृत्ती (इयत्ता ९ वी)
तृतीय: महाले तनुजा दिलीप (इयत्ता ९ वी)


सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राष्ट्रीय हरित सेना प्रमुख श्री.श्रीकांत घाणे यांनी इको-क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेचे उत्कृष्ठ नियोजन केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे व पर्यवेक्षक श्री.गोरख मालुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या स्पर्धा पार पडल्या.