July 25, 2026


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

इयत्ता सातवीमधील एकूण १० विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे उल्लेखनीय यश शक्य झाले आहे.

उत्तीर्ण विद्यार्थी व गुण:


कु. ईश्वरी भरत बांबेरे – 190/300
कु. स्नेहा राजेंद्र साबळे – 186/300
कु. संस्कृती योगेश कदम – 182/300
चि. सोहम दीपक वंजारी – 182/300
कु. सुदेष्णा संतराम बारवकर – 170/300
चि. शुभम रविंद्र कदम – 158/300
चि. वैष्णव विलास भालेराव – 158/300
कु. प्रज्ञा रवींद्र घिगे – 156/300
चि. चेतन गोरख हिले – 156/300
कु. अपेक्षा शिवाजी सदगीर – 150/300


कठोर परिश्रम आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातून मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री. दिपक बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.संजय व्यवहारे, मार्गदर्शक शिक्षक श्री.नानासाहेब शिंदे, श्री.धनंजय लहामगे, श्री.संजय देशमुख, श्रीमती कविता वाळुंज व त्याचबरोबर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

GO TO HOME PAGE